टेम्पो उलटल्याने एकाचा मृत्यू

मोशी – भरधाव टेम्पोची दुभाजकाला धडक बसून उलटल्याने टेम्पोमधील एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात मोशी-आळंदी रस्त्यावर गुरुवारी (दि.24) सायंकाळी सव्वा पाच वाजता झाला.

गणेशकृष्ण दास (वय-32) असे या अपघातात मयत झालेल्या मजुराचे नाव आहे. तर रिंटु विश्‍वास, अजयकुमार घुरु आणि प्रकाश साणा हे तीन मजूर जखमी झाले आहेत. रिंटु विश्‍वास (वय-24, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टेंपोचालक रमेश नागनाथ टिकोळे (वय-24, रा. बोऱ्हाडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)