टेम्पोच्या धडकेत महिला ठार

शिरवळ – पुणे-बंगलोर आशिया महामार्गावरील खंबाटकी घाटात दुचाकीला भरधाव टेम्पोने पाठीमागून धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली तर दुचाकीस्वार जखमी झाला. चंद्रभागा मुरलीधर बोरकर रा. गुणवडी ता. बारामती असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुरलीधर विठ्ठल बोरकर हे गुणवडी येथून मांढरदेव, ता. वाई येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून (एमएच 42 एव्ही – 4197) पत्नी चंद्रभागा यांना घेवून जात होते. यावेळी खंबाटकी घाट माथ्यावरील वळणावर पाठीमागून येणाऱ्या भरधाव टेम्पो (एमएच 43 -5497) दुचाकीला धडक दिली.

या अपघातात चंद्रभागा रस्त्यावर फेकल्या गेल्या व टेम्पोखाली सापडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती मुरलीधर हे किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी टेम्पोचालक दिलीप दादासाहेब निगडे रा. इंदिरानगर (लोणंद) यास ताब्यात घेतले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)