टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सासवड- येथे गुरुवारी (दि. 11) रात्री भरधाव टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात मुकुल चंद्रकांत जंगम (वय 30, रा. सासवड) या दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर टेम्पोचालक फरार झाला आहे.
याबाबत मृत मुकुल जंगम यांचे भाऊ रोहन नंदकुमार जंगम यांनी अज्ञात टेम्पोचालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड-हडपसर महामार्गावरील भोंगळे पेट्रोलपंपाजवळील तीव्र वळणावर गुरुवारी रात्री वेगाने आलेल्या टेम्पोने (एम.एच. 14, जी.डी 7098) ने जंगम यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)