भोसरी – टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे-आळंदी रोडवर तालेरा गोडाऊन गेटच्या समोर झाला.

पोलीस उपनिरीक्षक पी. एस. कदम यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुनील काशिनाथ घोगाणे (वय 48, रा. आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हृषीकेश संजय शिराळकर (वय 21, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृषीकेश मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे आळंदी रोडवरून ऍक्‍टिवा गाडीवरून जात होता. अचानक समोरून चुकीच्या दिशेने एक टेम्पो आला. टेम्पोची आणि हृषीकेश यांच्या दुचाकीची धडक झाली. टेम्पोचा वेग जास्त असल्याने दुचाकीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात हृषीकेशच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)