टेम्पोची धडक; पादचारी ठार

पिंपरी – कामावरून घरी जाणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नेहरूनगर येथे नुकतीच घडली.

नागनाथ नारायण गंडी (वय-54, रा. कामगारनगर, खराळवाडी, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा लक्ष्मण गंडी (वय-26) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी टेम्पो चालक सुर्यकांत विठ्ठल जाधव (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागनाथ गंडी कामावरून घरी पायी जात होते. नेहरूनगर येथे आल्यानंतर जाधव यांच्या टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. यामध्ये गंडी यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)