टेम्पोची तोडफोड, चालकाला मारहाण

पिंपरी – टेम्पो चालकाकडे पैशांची मागणी करून त्याला मारहाण करण्यात आली. तसेच टेम्पोची तोडफोड करून चालकाच्या खिशातून जबरदस्तीने चार हजार रुपये काढून घेतले. ही घटना पवारवस्ती दापोडी येथे बुधवारी (दि. 23) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

गोविंद सखाराम भोसले (वय-22, रा. सिद्धिविनायक कॉलनी, टॉवर लाईन, निगडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमेश्वर माने (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोविंद हे कामानिमित्त दापोडी मधील पवारवस्ती येथे गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपींनी त्याला अडवले. त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याच्या टेम्पोच्या काचा फोडून टेम्पोचे नुकसान केले. तसेच खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)