टेमघर धरण दुरुस्तीचे काम पुन्हा हाती

बाहेरील भितींवर ग्राऊटींग, ड्रिलींगचा वापर करून गळती रोखणार


धरण दुरुस्तीसाठी सुमारे 250 कर्मचारी


कामावर देखरेख ठेवण्यासाठी 12 अभियंते नियुक्त

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरण रिकामे करून धरण दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाकडून पुन्हा हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार धरणाच्या बाहेरील भितींवर ग्राऊटींग आणि ड्रिलींगचा वापर करून गळती रोखण्याचे काम केले जात आहे.

टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामासाठी धरण रिकामे असणे आवश्‍यक असल्याने टेमघर धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले. धरण पूर्णपणे रिकामे झाल्याने पूर्ण क्षमतेने दुरुस्तीचे काम मागील आठ दिवसांपासून सुरू आहे. टेमघर धरणाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून धरणात पाणीसाठा करण्यात सुरुवात झाली आहे. मात्र पाणीसाठविण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षांतच टेमघर धरणातून गळती होत आहे. 2016 मध्ये धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही बाब जलसंपदा विभागाने गांभार्याने घेतली. धरणातून पाणी गळतीचे प्रमाण प्रति सेंकद 2 हजार 500 लिटर एवढे होते. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. ही गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने सेवानिवृत्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार गळती रोखण्यासाठी ग्राऊटींगचे काम करण्यात आले.

-Ads-

यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दुरुस्तीचे काम बंद ठेवण्यात आले. आता पुन्हा सुमारे पाच महिन्यांनंतर धरण दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

धरण दुरुस्तीच्या कामामध्ये प्रामुख्याने ग्राऊटींगचे काम करण्यात येते. यामध्ये धरणाच्या बाहेरील भितींमध्ये सिमेंट, फ्लाय अॅश आणि सिलीका यांचे मिश्रण एका विशिष्ट दाबाणे सोडण्यात येते. त्यामुळे धरणाच्या भितींमधील पोकळ्या भरून येतात. भितींला मजबूती येत असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे.

साडेचार टीएमसी साठवण क्षमता
टेमघर धरण दुरुस्तीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर धरण यंदा 80 टक्‍के भरण्यात आले होते. धरणातून गळती होत असल्याने टेमघर धरण पूर्णक्षमतेने भरले जात नव्हते. यापूर्वी धरण 60 ते 70 टक्‍के इतकेच भरले जात होते. या धरणाची साठवण क्षमता सुमारे साडेचार टीएमसी इतकी आहे.

100 कोटींचा खर्च अपेक्षित
टेमघर धरण बांधण्यास 252 कोटी रुपये इतका खर्च आला होता. मात्र धरणातील पाण्याची गळती रोखण्यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)