टेबल टेनिस स्पर्धा: सुदेश शेलार मेमोरियल करंडक ‘यांना’ मिळाले विजेतेपद

करंडक-11स्पोर्टस राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे: पीएसपीबीच्या अचंता शरथ कमलने पुरुष गटात, तर पीएसपीबीच्या मधुरिका पाटकरने महिला गटात विजेतेपद पटकावताना सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्टस राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. यूथ मुलींमध्ये आरबीआयच्या श्रीजा अकुला हिने, तर यूथ मुलांच्या गटात गुजरातच्या मनुष शाहने हरियाणाच्या जीत चंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या अंतिम फेरीत पीएसपीबीच्य अचंता शरथ कमलने आरएसपीबीच्या अनिर्बन घोषचा 11-6, 11-8, 11-3, 11-5 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. त्याआधी उपान्त्य फेरीच्या लढतीत पीएसपीबीच्या अचंता शरथ कमलने अमलराज अँथोनीचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. तर आरएसपीबीच्या अनिर्बन घोषने पीएसपीबीच्या सनील शेट्टीचा 4-3 असा सनसनाटी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

महिलांच्या अंतिम सामन्यात पीएसपीबीच्या मधुरिका पाटकरने पीएसपीबीच्याच दिव्या देशपांडेचा 7-11, 10-12, 11-8, 11-9, 12-10, 11-5 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. त्याआधी उपान्त्य फेरीच्या सामन्यात पीएसपीबीच्या मधुरिका पाटकरने दुसऱ्या मानांकित मनिका बात्राचा 4-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद करत अंतिम फेरीत धडक मारली होती. बेल्जियम येथे होणाऱ्या आगामी प्रो टेबल टेनिस लीग स्पर्धेत मधुरिका सहभागी होणार आहे. यूथ मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत आरबीआयच्या श्रीजा अकुला हिने पश्‍चिम बंगालच्या प्राप्ती सेनचा 11-7, 5-11, 11-9, 14-16, 11-9, 9-11, 12-10 असा संघर्षपूर्ण पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. तर यूथ मुलांच्या एकतर्फी अंतिम लढतीत गुजरातच्या मनुष शाहने हरियाणाच्या जित चंद्राचा 11-6, 12-10, 12-10, 13-11 असा पराभव करताना विजेतेपद पटकावले.

 

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रक्‍कम अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव एम.पी.सिंग, बॅडमिंटन प्रशिक्षख निखिल कानेटकर, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे सल्लागार धनंजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयकर विभागाचे सहआयुक्त मिलिंद चहुरे, सिम्बायोसिस स्पाचे संचालक डॉ. सतीश ठिगळे, एमएसटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस, एमएसटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, स्पर्धा संचालक राजेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. सविस्तर निकाल- पुरुष गट- अंतिम फेरी- अचंता शरथ कमल (पीएसपीबी) वि.वि. अनिर्बन घोष (आरएसपीबी) 4-0 (11-6, 11-8, 11-3, 11-5),

उपान्त्य फेरी

अचंता शरथ कमल वि.वि.अमलराज अँथोनी (पीएसपीबी) 43(12/14,7/11,11/9,14/12,11/7,9/11,13/11; अनिर्बन घोष वि.वि. सनील शेट्टी (पीएसपीबी) 4-3( 11/9,11/9,10/12,11/9,9/11,8/11,11/9); महिला गट- अंतिम फेरी- मधुरिका पाटकर (4-पीएसपीबी) वि.वि. दिव्या देशपांडे (5-पीएसपीबी) 4-2 (7-11, 10-12, 11-8, 11-9, 12-10, 11-5), उपान्त्य फेरी – दिव्या देशपांडे(5)(पीएसपीबी)वि.वि.सागरिका मुखर्जी(आरएसपीबी) 4-1(11/6,11/7,11/1,9/11,11/6); मधुरिका पाटकर(4)(पीएसपीबी)वि.वि.मनिका बात्रा(पीएसपीबी) 4-2(10/12,11/1,13/11,6/11,11/9,12/10), यूथ गट मुली- अंतिम फेरी- श्रीजा अकुला (1-आरबीआय) वि.वि.प्राप्ती सेन (4-पश्‍चिम बंगाल) 4-3 (11-7, 5-11, 11-9, 14-16, 11-9, 9-11, 12-10), यूथ गट मुले- अंतिम फेरी – मानुष शाह (6-गुजरात) वि.वि जित चंद्रा (1- हरियाणा) 4-0 (11-6, 12-10, 12-10, 13-11)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)