टेबल टेनिस स्पर्धा: सिद्धी आचरेकर, अविनाश जोशी यांना विजेतेपद

एकम आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे: सिद्धी आचरेकरने ज्युनियर मुलींच्या एकेरीत, तर अविनाश जोशी यांनी 60 वर्षांवरील पुरुषांच्या एकेरीत विजेतेपद पटकावताना एकम स्पोर्टस क्‍लब आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. ज्युनियर मुलांच्या एकेरी विजेतेपदासाठी अग्रमानांकित श्रीयांशभोसलेसमोर द्वितीय मानांकित आदर्श गोपालचे आव्हान आहे.

-Ads-

ज्युनियर मुलींच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित सिद्धी आचरेकरने बिगरमानांकित पृथा आचरेकरचे कडवे आव्हान 11-2, 9-11, 11-3, 11-8, 7-11, 11-9 असे मोडून काढत विजेतेपदाची निश्‍चिती केली. सिद्धीने त्याआधी सृष्टी मिरपगारेचा 11-4, 11-5, 11-4, 11-7 असा पराभव केला होता. मुक्‍तांगण इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत असलेल्या सिद्धीचे या मोसमातील हे पहिलेच विजेतेपद आहे.

अग्रमानांकित अविनाश जोशी यांनी 60 वर्षांवरील पुरुषांच्या एकेरीतील अंतिम लढतीत द्वितीय मानांकित बापू काटदरे यांचा 6-11, 11-6, 11-5, 11-7 असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. अविनाश जोशी यांनी त्याआधी उपान्त्य फेरीत मधुकर तळेकर यांचा 11-8, 11-8, 11-2 असा पराभव केला होता. तसेच बापू काटदरे यांनी उपान्त्य फेरीत एम. बेग यांच्यावर 11-6, 11-3, 11-7 अशी मात केली होती.

दरम्यान ज्युनियर मुलांच्या एकेरीतील उपान्त्य लढतीत अग्रमानांकित श्रीयांशभोसलेने चतुर्थ मानांकित साई बगाटेचा प्रखड़ प्रतिकार 12-14, 11-2, 11-4, 11-9, 5-11, 6-11, 11-5 असा संपुष्टात आणताना अंतिम पेरीत धडक मारली. तर द्वितीय मानांकित आदर्श गोपालने बिगरमानांकित भार्गव चक्रदेवला 11-3, 10-12, 11-13, 11-9, 11-3, 6-11, 11-2 असे प्रदीर्घ लढतीनंतर नमविताना अंतिम फेरीत स्थान मिळविले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)