टेबल टेनिस स्पर्धा : राधिका, साक्षी, आनंदिता, देवयानी उपान्त्य फेरीत 

शारदा जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा 

पुणे – अग्रमानांकित राधिका सकपाळसह द्वितीय मानांकित देवयानी कुलकर्णी, तृतीय मानांकित आनंदिता लुणावत व चतुर्थ मानांकित साक्षी पवार या मानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना शारदा स्पोर्टस सेंटर आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील कॅडेट मुलींच्या एकेरीतील उपान्त्य फेरीत धडक मारली.
शारदा स्पोर्टस सेंटर, एरंडवणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील मिडजेट मुलींच्या एकेरीत अग्रमानांकित नभा किरकोळेसह तृतीय मानांकित तनया अभ्यंकर व चतुर्थ मानांकित नैशा रेवासकर या अव्वल मानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळविताना मिडजेट मुलींच्या एकेरीची उपान्त्य फेरी गाठली. परंतु द्वितीय मानांकित रुचिया दारवटकरला उपान्त्यपूर्व फेरीत विजय मिळविण्यासाठी पाच गेमपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली.

मिडजेट मुलांच्या एकेरीत अग्रमानांकित स्वरूप भडाळकरसह द्वितीय मानांकित रामानुज जाधवनेही चमकदार विजयाची नोंद करताना उपान्त्य फेरी गाठली. परंतु तृतीय मानांकित अधिराज सकपाळ आणि चतुर्थ मानांकित वीर डोणगावकर या मानांकितांचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. बिगरमानांकित वरद लाहोटने तृतीय मानांकित अधिराज सकपाळला 11-2, 11-7, 11-3 असे चकित करीत उपान्त्य फेरी गाठली. तर पाचव्या मानांकित आदित्य सामंतने चतुर्थ मानांकित वीर डोणगावकरला 11-5, 11-7, 11-1 असे नमविताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.

त्याआधी अग्रमानांकित स्वरूप भडाळकरने आर्यन पाटगिरीचा 11-5, 11-1, 11-4 असा धुव्वा उडवून उपान्त्य फेरी गाठली, तर द्वितीय मानांकित रामानुज जाधवने सातव्या मानांकित देव बैजलचा 11-5, 11-5, 11-7 असा पराभव करीत अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. मिडजेट मुलींच्या एकेरीत अग्रमानांकित नभा किरकोळेने प्रिशा ठाकूरचा 11-3, 11-2, 11-9 असा फडशा पाडताना उपान्त्य फेरी गाठली. तर तृतीय मानांकित तनया अभ्यंकरने दृष्टी कृष्णाचा 11-1, 11-1, 11-7 असा धुव्वा उडवीत आगेकूच केली. चतुर्थ मानांकित नैशा रेवासकरनेही रेवा चव्हाणचा प्रतिकार 11-9, 11-4, 11-9 असा मोडून काडला. मात्र आकांक्षा मार्कंडेने द्वितीय मानांकित रुचिया दारवटकरकडून पराभव पत्करण्यापूर्वी तिला 11-8, 11-9, 3-11, 6-11, 4-11 अशी प्रखर झुंज दिली.

तत्पूर्वी कॅडेट मुलींच्या उपान्त्यपूर्व फेरीत अग्रमानांकित राधिका सकपाळने नभा किरकोळेला 11-2,1 1-7, 11-6 असे पराभूत करीत उपान्त्य फेरी गाठली, तर द्वितीय मानांकित देवयानी कुलकर्णीने सातव्या मानांकित श्रिया शेलारला 11-6, 11-0, 11-5 असे नमवून आगेकूच केली. तृतीय मानांकित आनंदिता लुणावतने सहाव्या मानांकित रिया पाठकचा कडवा प्रतिकार 11-5, 13-11, 11-8 असा मोडून काढत उपान्त्य फेरीत स्थान मिळविले. तर चतुर्थ मानांकित साक्षी पवारने पाचव्या मानांकित जान्हवी फणसेचा 12-10, 11-9, 11-7 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.

ज्युनिर मुलींच्या एकेरीत अग्रमानांकित अंकिता पटवर्धनसह द्वितीय मानांकित पृथा वर्टीकर, पाचवी मानांकित पूजा जोरावर, सहावी मानांकित सिद्धी आचरेकर, सातवी मानांकित स्वप्नाली नरळे आठवी मानांकित मृण्मयी रायखेलकर आणि 13वी मानांकित राधिका सकपाळ या मानांकितांनी, तसेच बिगरमानांकित प्रीती गाढवेनेही उपान्त्यपूर्व फेरी गाठली. प्रीती गाढवेने तृतीय मानांकित श्रुती गभाणेवर सनसनाटी मात करताना आगेकूच केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)