टेबल टेनिस स्पर्धा : राधिका व नील कॅडेट गटांत विजेते 

शारदा जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा 

पुणे – राधिका सकपाळ आणि नील मुळ्ये या अग्रमानांकित खेळाडूंनी आपापल्या गटातील अंतिम फेरीत एकतर्फी विजयाची नोंद करताना कॅडेट मुली व मुलांच्या एकेरीत विजेतेपद पटकावून शारदा स्पोर्टस सेंटर आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. त्याआधी नभा किरकोळे आणि स्वरूप भडाळकर यांनी मिडजेट मुली व मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले होते.

शारदा स्पोर्टस सेंटर, एरंडवणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील कॅडेट मुलांच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित नील मुळ्येने तृतीय मानांकित वेदांग जोशीचा कडवा प्रतिकार 12-10, 11-3, 15-13 असा संपुष्टात आणताना विजेतेपदाची निश्‍चिती केली. त्याआधी कॅडेट मुलांच्या उपान्त्य लढतीत अग्रमानांकित नील मुळ्येने पाचव्या मानांकित कुमार कुलकर्णीवर 11-3, 11-5, 11-4 असा विजय मिळविला होता. तर तृतीय मानांकित वेदांग जोशीने द्वितीय मानांकित दक्षा जाधवचे आव्हान 5-11, 11-6, 11-6, 7-11, 11-7 असे संपुष्टात आणले होते. कॅडेट मुलींच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित राधिका सकपाळने तृतीय मानांकित आनंदिता लुणावतची झुंज 11-3, 11-5, 11-8 अशी मोडून काढताना विजेतेपद संपादन केले. तत्पूर्वी कॅडेट मुलींच्या उपान्त्य फेरीत अग्रमानांकित राधिका सकपाळने चतुर्थ मानांकित साक्षी पवारला 11-6, 11-5, 11-5 असे पराभूत केले होते. तर दुसऱ्या उपान्त्य लढतीत तृतीय मानांकित आनंदिता लुणावतने द्वितीय मानांकित देवयानी कुलकर्णीवर 11-8, 11-7, 15-13 अशी मात केली होती.

सबज्युनियर मुलींच्या एकेरीत अग्रमानांकित पृथा वर्टीकरसह द्वितीय मानांकित अनीहा डिसोझा, तृतीय मानांकित मृम्मयी रायखेलकर, चतुर्थ मानांकित मयूरी ठोंबरे, पाचवी मानांकित राधिका सकपाळ, सहावी मानांकित धनश्री पवार, सातवी मानांकित देवयानी कुलकर्णी आणि आठवी मानांकित साक्षी पवार या मानांकितांनी वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. नवव्या मानांकित आनंदिता लुणावतने आठव्या मानांकित साक्षी पवारकडून पराभूत होण्यापूर्वी तिला 8-11, 9-11, 11-7, 11-4, 7-11 अशी कडवी झुंज दिली. बिगरमानांकित जान्हवी फणसेला पराभूत करण्यासाठी चतुर्थ मानांकित मयूरी ठोंबरेला 11-5, 10-12, 11-6, 11-4 अशी लढत द्यावी लागली. बिगरमानांकित मेघा काजळेनेही सहाव्या मानांकित धनश्री पवारला 9-11, 11-8, 10-12, 8-11 अशी झुंज दिल्यानंतरच पराभव स्वीकारला.

सबज्युनियर मुलांच्या एकेरीत अग्रमानांकित अनेय कोवेलामुडीसह द्वितीय मानांकित अर्चन आपटे, तृतीय मानांकित भार्गव चक्रदेव, चतुर्थ मानांकित आदी फ्रॅंक आगरवाल, पाचवा मानांकित आदित्य जोरी, आठवा मानांकित नील मुळ्ये आणि नववा मानांकित अद्वैत ढवळे या प्रमुख मानांकितांनी चमकदार विजयाची नोंद करताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. या गटात दहाव्या मानांकित वेदांग जोशीने सातव्या मानांकित आदित्यवर्धन त्रिमळला 11-5, 5-11, 8-11, 11-8, 9-11 अशी लढत दिल्यानंतरच पराभव पत्करला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)