टेनिस स्पर्धा: भक्ती मैन्दरकर, शार्दुल खवळे यांचा मानांकित खेळाडूंवर विजय 

पीसीआय/एपीआय ओम दळवी मेमोरिअल करंडक टेनिस स्पर्धा 
पुणे: भक्ती मैन्दरकर आणि शार्दुल खवळे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत ओम दळवी मेमोरिअल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीएच्या मान्यतेखाली पीसीआय/एपीआय ओम दळवी मेमोरिअल 10 वर्षाखालील करंडक टेनिस स्पर्धेत आपापल्या गटात उपांत्य फेरीत धडाक्‍यात प्रवेश केला आहे. 
महाराष्ट्र पोलिस मोटर ट्रान्सपोर्ट डिव्हिजन टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगरमानांकित भक्ती मैन्दरकर हिने दुसऱ्या मानांकित अरिना डिसुझाचा 6-0 असा एकतर्फी पराभव करताना स्पर्धेतील सर्वात सनसनाटी निकालाची नोंद केली. सामन्याच्या सुरुवाती पासुनच भक्तीने अरिनावर दबाव वाढवत उत्कृष्ठ खेळाचा नमुना सादर केला. यावेळी दुसरे मानांकन असलेल्या अरिनाला आपल्या लौकिकास साजेशा खेळ करता आला नाही त्यामुळे तिच्या वरिल दबाव आनखिनच वाढला आणि तिला पराभवाला सामोरे जावे लागले. तर अन्य एका सामन्यात अव्वल मानांकित देवांश्री प्रभुदेसाईने सातवे मानांकन असलेल्या प्रिशा शिंदेला 6-3 असे सहज पराभुत करताना उपान्त्य फेरीत आपले स्थान पक्‍के केले. तर यावेळी तिसरे मानांकन असलेल्या पार्थसारथी मुंडेने नवव्या मानांकित मृणाल शेळकेचा 6-2 असा एकतर्फी पराभव करून धडाक्‍यात उपांत्य फेरी गाठली. 
तर, मुलांच्या गटात बिगरमानांकित शार्दुल खवळे याने बाराव्या मानांकित अयान शेट्टीचा 6-2 असा एकतर्फी पराभव करून खळबळजनक विजयाची नोंद करताना स्पर्धेत आगेकूच केली. तर, अव्वल मानांकित अभय नागराजनने सातव्या मानांकित दिवीज पाटीलचे आव्हान 6-1 असे सहज मोडीत काढले. सामन्यात अभयने दिवीजला प्रत्युत्तराची संधीच दिली नाही त्यामुळे दिवीज पहिल्या पासुनच दबावात खेळताना दिसला आणि त्याचा फायदा अभयने उचलत सहज विजय प्राप्त केला. 
 
सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी : 10 वर्षाखालील मुले : 
अभय नागराजन (1) वि.वि. दिवीज पाटील (7) 6-1; देव तुराकिया (5) वि.वि. नमिश हूड 6-1; शार्दुल खवळे वि.वि. अयान शेट्टी (12) 6-2; 
अर्चित धुत (6) वि.वि आयुष पुजारी (14) 6-0 
10 वर्षाखालील मुली: 
देवांश्री प्रभुदेसाई (1) वि.वि.प्रिशा शिंदे (7) 6-3; पार्थसारथी मुंडे (3) वि.वि. मृणाल शेळके (9) 6-2; अरमानी नलावडे (4) वि.वि.वैष्णवी सिंग (12) 6-2; भक्ती मैन्दरकर वि.वि. अरिना डिसुझा (2) 6-0. 
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)