टेनिस स्पर्धा: जगदीश सुंदर याला एकेरीत विजेतेपद

अरुण वाकणकर मेमोरियल करंडक टेनिस स्पर्धा
दुहेरीत रोहित शिंदे व ज्ञानेश्वर पाटील जोडी अजिंक्‍य

पुणे: मंदार वाकणकर टेनिस अकादमी यांच्यातर्फे व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जगदीश सुंदर याने आर्यन हूड याच्यावर संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना अरुण वाकणकर मेमोरियल करंडक पुरुष टेनिस स्पर्धेतील हौशी एकेरी गटात विजेतेपद पटकावले.

डेक्‍कन जिमखाना कोर्टवर येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील हौशी एकेरीच्या अंतिम लढतीत जगदीश सुंदर याने आर्यन हूड याचा 7-6(9) असा टायब्रेकमध्ये पराभव केला. दुहेरी गटाच्या अंतिम लढतीत रोहित शिंदे व ज्ञानेश्वर पाटील या जोडीने जॉय व पृथ्वीराज पाटील यांचा 8-4 असा पराभव करत दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण गेम ऑन इव्हेंटस्‌चे संचालक सुनील लुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदार वाकणकर उपस्थित होते
सविस्तर निकाल-
हौशी गट – अंतिम फेरी – जगदीश सुंदर वि.वि आर्यन हूड 7-6 (9),
दुहेरी गट- अंतिम फेरी
रोहित शिंदे व ज्ञानेश्वर पाटील वि.वि जॉय व पृथ्वीराज पाटील 8-4.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)