टेनिस स्पर्धा : अरमानी नलावडे, अभय नागराजन यांना विजेतेपद 

पीसीआय/एपीआय ओम दळवी मेमोरिअल करंडक टेनिस स्पर्धा 
पुणे: अरमानी नलावडे आणि अभय नागराजन या खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना ओम दळवी मेमोरिअल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीएच्या मान्यतेखाली पीसीआय/एपीआय ओम दळवी मेमोरिअल 10 वर्षाखालील करंडक टेनिस स्पर्धेत आपापल्या गटात विजेतेपद संपादन केले आहे.
महाराष्ट्र पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट डिव्हिजन टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात मुंबईच्या चौथ्या मानांकित अरमानी नलावडेने अव्वल मानांकित पुण्याच्या देवांश्री प्रभुदेसाईचा 3-5, 4-2, 4-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्याचा निकाल अगदीच अनपेक्षित लागला. कारण देवांश्रीला अग्रमानांकन प्राप्त झालेले होते आणि तिने या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना विजयाची कोणतीही संधी दिलेली नव्हती. मात्र, अंतिम सामन्यात अरमानीने देवांश्रीला कडवी लढत देताना विजय मिळवला. सामन्यातील पहिला सेट देवांश्रीने 3-5 असा जिंकला होता मात्र, अरमानीने पुढील दोन्ही सेट आपल्यानावे करत सामन्यात विजय मिळवला.
तर, मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित अभय नागराजनने सहाव्या मानांकित अर्चित धुतचा 4-2, 4-0 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. अभय हा जीआयएस केम्बरीज स्कुलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून पोलीस रिसर्च सेंटर येथे प्रशिक्षक सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे चालू वर्षातील आपल्या गटातील तिसरे विजेतेपद आहे.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीसीआय/एपीआयचे संचालक भगवानदास अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मारुती राऊत आणि सुपरवायझर प्रवीण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सविस्तर निकाल: 
10 वर्षाखालील मुले –
उपांत्य फेरी – अभय नागराजन (1) वि.वि. देव तुराकिया (5) 6-0, अर्चित धुत (6) वि.वि. शार्दुल खवळे 6-5 (7-3).
अंतिम फेरी: अभय नागराजन (1) वि.वि. अर्चित धुत (6) 4-2, 4-0.
10 वर्षाखालील मुली –
उपांत्य फेरी: देवांश्री प्रभुदेसाई (1) वि.वि. पार्थसारथी मुंडे (3) 6-4, अरमानी नलावडे (4) वि.वि. भक्ती मैन्दरकर 6-2.
अंतिम फेरी: अरमानी नलावडे (4) वि.वि. देवांश्री प्रभुदेसाई (1) 3-5, 4-2, 4-1.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)