टेनिस स्टार सानिया मिर्झाकडे गुड न्यूज

मुंबई : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाकडे गुड न्यूज आहे. सानियाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन आपल्या प्रेग्नन्सीचे संकेत दिले आहेत. सानियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो अत्यंत गोड आहे. फोटोमध्ये एक मोठा वॉर्डरोब आहे. डावीकडील टीशर्टवर मिर्झा लिहिले आहे, तर उजवीकडे असलेल्या टीशर्टवर मलिक लिहिले आहे.

वॉर्डरोबच्या मध्यभागी असलेल्या खणात लहान बाळाचे छोटेसे कपडे आहेत. त्यावर मिर्झा मलिक लिहिले आहे. सानिया आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला मुलगी हवी असल्याची इच्छा व्यक्त केली होती. बाळाचे आडनाव मिर्झा मलिक असेल, असे तिने सांगितले होते. सानिया आणि शोएब यांनी 2010 मध्ये निकाह केला होता. पाकिस्तानी नागरिकाशी लग्न केल्यामुळे सानियावर टीकेची झोड उठली होती. लग्नाला आठ वर्ष झाल्यानंतरही सानियाला अधूनमधून ट्रोल केले जाते.

#BabyMirzaMalik ??❤️ @daaemi

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)