टेनिसपटू सानिया मिर्झावर बनणार बायोपिक

बॉलीवुडमध्ये सध्या एका पाठोपाठ एक बायोपिक चित्रपट प्रदर्शित होत आहे. या बायोपिकमध्ये काही चित्रपट हे खेळाडूंवर आधारित होते. यापूर्वी महेंद्रसिंह धोनीवर आधारित बायोपिकनंतर भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंह यांच्यावर आधारित “सूरमा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

याशिवाय श्रद्धा कपूर ही बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, तर हर्षवर्धन कपूर हा नेमबान अभिनव बिंद्रा यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यानंतर आता निर्माता रॉनी स्क्रूवाला हे भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यावर आधारित बायोपिक चित्रपट साकारणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यासाठी अनेक जण प्रयत्नात होते. मात्र, सानियावर आधारित चित्रपट बनविण्याचे राइट्‌स रॉनी स्क्रूवाला यांनी विकत घेतले आहेत. यात सानियाच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याबद्‌दलची माहिती दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी लवकरच दिर्ग्दशकाची निवड करण्यात येणार असून त्यानंतर कास्टिंग होणार आहे.

सानियाचा जन्म मुंबईत झाला होता. परंतु जन्मानंतर ती आई-वडिलांसह हैदराबाद गेली. सानियाने 6 व्या वर्षीच टेनिस खेळण्यास सुरूवात केली होती. तिने 2003मध्ये दुहेरी विम्बलडनचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने 6 ग्रॅण्ड स्लॅम किताब जिंकले. तिने केलेल्या या कामगिरीची दखल घेत भारत सरकारने सानियाला पद्मश्री, पद्म भूषण, राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)