टेक महिंद्रा संघाचा मोठा विजय

15वी अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धा

पुणे: टेक महिंद्रा संघाने मास्टरकार्ड संघाचा तर अर्न्स्ट अँड यंग संघाने टॅलेंटीका संघाचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत आगेकुच नोंदवली.

व्हिजन क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या सामन्यात सौरभ देवरेच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने मास्टरकार्ड संघाचा 153 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खाळताना सचिन पिंपरीकरच्या 70 व सौरभ देवरेच्या 69 धावांच्या बळावर टेक महिंद्रा संघाने 20 षटकात 4 बाद 255 धावांचा डोंगर रचला. 255 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिक दुबे , सौरभ देवरे व सचिन कुलकर्णी यांच्या आक्रमक व अचूक गोलंदाजीपुढे मास्टरकार्ड संघ केवळ 12.5 षटकात सर्वबाद 102 धावांत गारद झाला. 24 चेंडूत 69 धावा व 9 धावांत 2 गडी बाद करणारा सौरभ देवरे सामनावीर ठरला.

तर, दुसऱ्या लढतीत चिन्मय जोशीच्या अष्टपैलू कामगिरीसह अर्न्स्ट अँड यंग संघाने टॅलेंटीका संघाचा 6 गडी राखून पराभव केला.

सविस्तर निकाल – साखळी फेरी –
टेक महिंद्रा- 20 षटकांत 4 बाद 255 (अमितोष निखार 35, सचिन पिंपरीकर 70, अंकित ठाकरे 33, सौरभ देवरे 69, रजत भट्टलवार नाबाद 21, ईशान शेंडे 2-44) वि.वि मास्टरकार्ड- 12.5 षटकांत सर्वबाद 102 (मंदार नायर 40, प्रतिक दुबे 3-24, सौरभ देवरे 2-9, सचिन कुलकर्णी 2-5) सामनावीर- सौरभ देवरे.
टॅलेंटीका- 19.5 षटकांत सर्वबाद 130 (अक्षय शिंदे 31, रामकृष्ण वेर्मा 21, रुपम दास 22, किरण शेट्टी 3-25, राहुल प्रसाद 2-18, विरोजा 2-24) पराभूत वि अर्न्स्ट अँड यंग- 17.4 षटकांत 4 बाद 134 (अभिषेक बक्षी 29, अजिंक्‍य पाटील 27, चिन्मय जोशी नाबाद 29, रुपम दास 2-26) सामनावीर- चिन्मय जोशी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)