टेक्‍सास प्रांतात पाचव्या दिवशीही चक्रीवादळाचा धुमाकूळ ; 30 ठार

ह्युस्टन – अमेरिकेत टेक्‍सास प्रांतात आज पाचव्या दिवशीही चक्रीवादळाचा तडाखा कायमच असून या वादळामुळे या प्रांतातील सामान्य जनजीवन जवळपास ठप्प झाले आहे. यामुळे ठिकठिकाणी झालेल्या पडझडीत किमान तीस जणांचा मृत्यू झाला असून अमेरिकेच्या इतिहासातील ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे. या चक्रीवादळामुळे अक्षरश हजारो लोक रस्त्यावर आले असून याची संधी घेऊन चोऱ्या किंवा लुटालुट होऊ नये म्हणून ह्युस्टनच्या महापौरांनी शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

या वादळग्रस्तांच्या मदतीसाठी हजारो इमर्जन्सी रिक्‍स्यु टीम कामाला लागल्या आहेत. या भागाला जोरदार पावसाचाही तडाखा बसण्याची शक्‍यता आहे असा अदांज हवामान खात्याने वर्तवला असल्याने तेथे अधिक दक्षता घेतली जात आहे. वादळामुळे झालेल्या पडझडीमुळे आणि काही ठिकाणी घरात शिरलेल्या पाण्यामुळे हजारो लोक घरे तशीच सोडून बाहेर उघडयावर आल्याने तेथे लुटालुटीचा प्रयत्न काहींनी केला. त्यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे.

आपण होमलॅंड सिक्‍युरिटीची माणसे आहेत असे भासवून हे लुटीचेही प्रकार घडत असल्याचे लक्षात आले आहे त्यामुळे त्यावरही उपाययोजना करण्यात यंत्रणा गुंतल्या आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्‌भवल्याने तेथे फसलेल्या 1300 जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. ह्युस्टन परिसरात सुमारे एक लाख भारतीय नागरीक वास्तव्याला आहेत त्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)