टेक्‍सासमधील बॉम्बस्फोटातील संशयिताची आत्महत्या

ह्युस्टन (अमेरिका) – अमेरिकेतील टेक्‍सास प्रांतात साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या संशयित हल्लेखोराने आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. टेक्‍सासची राजधानी ऑस्टिनमध्ये तीन आठवड्यांपूर्वी एका पार्सल बॉम्बचा स्फोट झाला होता. तेंव्हापासून ऑस्टिनमध्ये बॉम्बस्फोटांच्या मालिका झाला होत्या. यामुळे शहरात सुरक्षेसाठी शेकडो पोलिसांना तैनात करण्यात आले होते.

ऑस्टिन शहरात सर्वप्रथम 2 मार्च रोजी पहिला बॉम्बस्फोट झाला होता. हा बॉम्बस्फोट घडवणारी व्यक्‍ती साखळी बॉम्बस्फोट घडवणारी सराईत व्यक्‍ती असली पाहिजे, असे तपासादरम्यान लक्षात आले होते. या हल्लेखोराने आपली घातपात करण्याची पद्धत वारंवार बदलली होती. तेंव्हापासून शहरात गेल्या 19 दिवसात पाच ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यापैकी चार स्फोट ऑस्टिनमध्ये तर एक स्चेत्झ येथे झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या स्फोटांमध्ये दोघे जण ठार झाले होते, तर अन्य सहा जण जखमी झाले होते.

या संदर्भात 24 वर्षीय श्‍वेतवर्णिय युवकावर संशय होता. पोलिसांनी शहराच्या उत्तर भागात राऊंड रॉक जवळ या युवकाला हेरले आणि महामार्गावर त्याची कार थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने आपल्याजवळील स्फोटकांचा स्फोट घडवून आत्महत्या केली.

या संशयित हल्लेखोराने गुगलवरून शीप पॅकेजिंगची माहिती मिळवली होती, असे तपास अधिकाऱ्यांना लक्षात आले होते. त्याचा माग काढत पोलिस हल्लेखोरापर्यंत जाऊन पोहोचले होते. पण पकडण्यापूर्वीच त्याने स्फोट घडवून आणला. या हल्लेखोराने सॅन ऍन्टोनिओ येथे आणखी एक स्फोट घडवला होता. तर त्याच दिवशी ऑस्टिनजवळ त्याने ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होण्यापूर्वी हस्तगत करण्यात आला.

हे स्फोट घडवण्यामागे केवळ द्वेष भावना हे कारण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परिसरातील कोणत्याही संशयास्पद वस्तूबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)