टेंभुर्णी-लातूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कार्यारंभ आदेशानंतर कामाला सुरूवात

File Photo

मुंबई – टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर या रस्ता राज्यमार्ग क्र.१४५ वर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. याबाबत लवकरच कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरूवात केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात सदस्य त्र्यंबकराव भिसे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, याबाबत राज्यामध्ये सहा कोटींची कामे मंजूर केली आहेत. यासाठी निविदा काढण्यात आल्या असून राज्यात २९ कोटी ४७ लाखाचा निधी यासाठी देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून ३० कोटी ५९ लाख देण्यात आले आहेत. रूंदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले असून रुंदीकरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)