टेंपोला कारची धडक, दोन गंभीर

कराड, दि. 4 (प्रतिनिधी) ः कराडकडून कोल्हापूरकडे जात असलेल्या टेम्पोला कारची पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर नांदलापूर गावच्या हद्दीत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच आडवी झाल्यामुळे वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो (क्र. एमएच 50 एस 2799) कराडकडून कोल्हापूरकडे जात होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर नांदलापूर गावच्या हद्दीत आला असता पाठीमागून कोल्हापूरच्याच दिशेने निघालेल्या कारने (एमएच 11 बी व्ही 6717) ची टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होवून जखमींना उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल केले. जखमींची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच आडवी असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)