टेंपोच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

टेंपोचालकाला पाठलाग करून अटक

भुईंज- पुणे-सातारा महामार्गा वरील बदेवाडी गावच्या हद्दीत आयशर टेंम्पोने पाठीमागुन दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. टेंपोचालकाला पोलिसांनी पाठलाग करून पाचवड येथे पकडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे-सातारा महामार्गावरून विशाल महिपती वैराट (वय 27) राजेंद्र पांडुरंग महामुनी असे दोघे दुचाकीवरून किकली गावाकडे जात होते. त्यांची दुचाकी पद्‌मावती मंदिराजवळ असता मागून भरघाव वेगात आलेला आयशर टेंम्पाने दुचाकीला पाठीमागगून जोराची धडक दिली. धडकेत दुचाकी वरील दोघे रस्त्यावर फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले. हे पाहुन टेंम्पो चालक अब्दुलहमीद मकबुल मणेर वय 67 राहणार ऊडतारे ता वाई हा तसाच न थांबताच पळुन गेला. भुईंज पोलिसांनी टेंम्पोचा पाठलाग करुन त्यास पाचवड ता. वाई गावच्या हद्दीत पकडुन त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय मोरे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)