टेंडर मंजूर करण्याच्या आमिषाने फसवणूक

65 हजारांचा गंडा, आरोपीस चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

प्रभात वृत्तसेवा

पुणे – नव्याने उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलसाठी जनरेटची आवश्‍यकता असल्याचे सांगत टेंडर मंजूर करण्याचे आमिष एका कंपनीस दाखविण्यात आले. यासाठी कंपनीकडून ऑन लाईन पध्दतीने 66 हजार 500 रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हवेली पोलीसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असतान 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तेजस अशोक शहा उर्फ मितेश पारेख(32,रा.आंबेगाव) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कांचन संजय खराडे(33,रा.सनसिटी, आनंदनगर) यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादींच्या ई-मेल आयडीवर आरोपीने परचेस संदर्भात मेल केला होता. यामुळे फिर्यादीच्या कार्यालयातील कर्मचारी ऋतुजा दास यांनी त्याला फोन केला. यावेळी आरोपीने स्वत:चे नाव डॉ.मितेश पारेख असे सांगून मुंबईतील एम्स हॉस्पिटलचा पर्चेस ऑफीसर असल्याचा बनाव केला.हॉस्पिटलची शिरवळ येथे नवीन शाखा उघडली जात आहे. त्यासाठी आम्हाला दोन जनरेटर पॅनेलसह लागणार आहेत. त्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर टेंडर भरू शकाल , टेंडर पास करण्याची जबाबदारी माझी असेल असे सांगितले. त्यासाठी टेंडर फी म्हणून चार टेंडर फॉर्म भरावे लागती, प्रत्येक फॉर्मसाठी 8 हजार 200 रुपये भरावे लागतील. याप्रमाणे दोन टेंडरकरीता 66 हजार 500 रुपये भरावे लागतील असे सांगत ई मेल ैआयडी देऊन इक्वीटेशन मेल पाठविला. तसेच डॉ. शैला आर.चव्हाण यांच्या एसबीआय खात्याचा नंबर पाठवून त्यावर ऑनलाईन पैसे भरावयास सांगितले. फिर्यादी यांनी पैसे भरल्यानंतर टेंडरची चौकशी केली असता, त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
यातील आरोपीकडून फसवणूकीची रक्कम वसूल करणे आहे, त्याने दिलेल्या एसबीआय बॅंकेच्या खात्याची चौकशी करायची आहे तसेच त्याचे इतर साथीदार आहेत का ? याचा तपास करायला असल्याने सरकारी वकिलांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावर न्यायालयाने 4 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)