टॅ्रक्टर पलटी होवून एक ठार

मल्हारपेठ, दि. 25 (वार्ताहर) – निसरेफाटा येथील विहे घाटाजवळच्या शेतात ट्रॅक्टर पलटी होवून झालेल्या अपघातात चालक संताजी पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार, दि. 24 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याचे सुमारास निसरे, ता. पाटण घाटाजवळील बाबुराव मारुती चव्हाण यांचे शेतात ट्रॅक्टर रोटर मारताना ट्रॅक्टर पलटी होवून त्याखाली चालक संताजी सदाशिव पवार (वय 40) रा. नावडीवसाहत यांच्या छातीवर दाब पडून अंतर्गत रक्तस्त्राव होवून त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची खबर धनाजी सदाशिव पवार यांनी मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रात दिली. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पाटण येथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेने नावडी परिसरात शोककळा पसरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)