टॅंकर माफियांची जलसंपदा करणार चौकशी?

15 डिसेंबरपर्यंत अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश

पुणे – उंदीर, घुशी, खेकड्यांच्या बिळांमुळे मुठा उजवा कालवा फुटल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने दिला होता. मात्र आता या कहाणीत “ट्‌विस्ट’ निर्माण झाले असून, कालव्या लगत असलेल्या खासगी पाणीपुरवठा व्यावसायिकांच्या अनधिकृत बोअरवेलमुळे तो फुटला का? यासंदर्भात तपासणी करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर, या दुर्घटनेची कारणे शोधून काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीकडून या घटने संदर्भात सविस्तर अहवाल शासनाला देण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाने समितीला काही सूचना दिल्या असून यासंदर्भात सत्यता तपासून येत्या 15 डिसेंबरपर्यंत अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कालव्या लगत अनधिकृत टॅंकर चालकांनी बोअरवेल घेतले आहेत का? याची तपासणी करण्याचे आदेश समितीला दिले आहेत. राज्य सरकारने कालवा दुर्घटने संदर्भातील कारणे, कालव्याची सुरक्षितता, धोकादायक ठिकाणे शोधणे, तसेच यासंदर्भात कोणत्या उपाययोजना आवश्‍यक आहेत. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना होवू नये यासाठी खबरदारीचे कोणते उपाय आहेत? हे तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय महापालिका हद्दीतून जाणाऱ्या कालव्यासंदर्भात देखभाल दुरुस्तीचा अहवाल राज्य सरकारकडून मागवण्यात आला आहे.

पथकाकडून घटनास्थळाची पाहणी
या तपासणी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून योग्य प्रकारे नियोजन झाले का? योग्य पद्धतीने कालव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे का? याची माहितीही समितीकडून मागविण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)