टॅंकर -टेम्पोच्या धडकेत तीन जखमी

भाळवणी – येथील नगरकडे जाणाऱ्या एस.के.आर. चौकात शनिवारी(दि.30) दुपारी तीनच्या सुमारास दुधाचा टॅंकर व मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक होऊन टेम्पोचालकासह तीन जण जखमी झाले.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, भाळवणी पासून नगरकडे जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराजवळील एस.के.आर. चौकात भर दुपारी तीनच्या सुमारास दैठणे गुंजाळ परिसरातील दुध घेऊन आळेफाट्याकडे जात असलेल्या एम.एच. 14 बी.जे. 2996 या टॅंकरची व पारनेरहून भाळवणी मार्गे नगरकडे ट्रॅक्‍टरचे साहित्य दुरूस्तीसाठी घेऊन जात असलेल्या एम.एच. 16 ए.वाय.8471 या टेम्पोची जोराची धडक झाली. यात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टेम्पोचालक बाळासाहेब लहू औटी, नामदेव औटी व खरमाळे फिटर हे तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.
कल्याण -नगर -विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग झाल्याने वाहतूकीत मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून लहान -मोठे अपघात भाळवणी परिसरात होत आहेत .त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. रस्ते चांगले झाल्याने वाहनांचा वेग नियंत्रित होत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. गावानजीक संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदाराने ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)