टॅंकरमुक्‍त महाराष्ट्रासाठी भिडणार 249 गावांचा शिवार

248 कोटींचा आराखडा तयार : टंचाईग्रस्त गावांना दिलासा

नगर – महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्‍त शिवार अभियानाचे चौथे वर्ष आहे. 2018-19 या अभियानाच्या चौथ्या वर्षांत जिल्ह्यातील 249 गावांची निवड जिल्हाधिकारी तथा जलयुक्‍त शिवार योजनेचे जिल्हास्तरीय अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी केली आहे. त्यासाठी 248 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जलसंधारणमंत्री, संबंधित आमदारांची मान्यता घेऊन हा आराखडा शासनास पाठविण्यात येणार आहे. टॅंकरमुक्‍त महाराष्ट्रासाठी 249 गावांचा शिवार भिडणार असून, त्यासाठी प्रशासनही सज्ज झाल्याचे चित्र आहे.

-Ads-

शिवारफेरीनंतर जलसंधारणाच्या कामांचे आराखडे तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टॅंकरमुक्‍त महाराष्ट्रासाठी जलयुक्‍त शिवार अभियानाची घोषणा केली. ज्या गावात वर्षांनुवर्ष टंचाईच्या काळात टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागतो. माय माउली यांची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, तसेच पावसाचा प्रत्येक थेंब शिवारातच अडला जाऊन शिवार पाणीदार व्हावा, हा प्रमुख उद्देश घेऊन जलयुक्‍त शिवार अभियान योजना शासनाने सुरू केली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळत आहे.

तीन वर्षात 788 गावांचा शिवार पाणीदार

2015-16 या पहिल्या वर्षात जलयुक्‍तमध्ये 279 गावांची निवड करण्यात आली. 2016-17 मध्ये 268 तर 2017-18 तिसऱ्या वर्षात 241 गावांची निवड करण्यात आली होती. तीन वर्षाच्या अवधीत एकूण 788 गावात जलयुक्‍त शिवार योजनेची कामे करण्यात आली.

 “जलयुक्‍त शिवार अभियानात 2018-19 या वर्षासाठी जिल्ह्यातील 249 गावांची निवड केली आहे. 2018-19 साठी 248 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, जलसंधारणमंत्री व संबंधित लोकप्रतिधींची मान्यता घेऊन हा आराखडा शासन दरबारी पाठविण्यात येईल”.
– राहुल द्विवेदी ,जिल्हाधिकारी

जलयुक्‍त शिवार अभियानात 2018-19 साठी निवड करण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे

नगर तालुका– शिराढोण, गुणवडी, वाळुंज, मठपिंप्री, अंबिलवाडी, मेहेकरी, सोनेवाडी पि., जांब, टाकळी काझी, कोल्हेवाडी, भातोडी पारगाव, पारेवाडी, दशमगव्हाण, सांडवी, माथणी, खांडकी, आगडगाव, नारायणडोह, सोनेवाडी, खंडाळा, टाकळी खातगाव, खातगाव टाकळी, शहापूर, राळेगण, माळेवाडी, देवगाव, रतडगाव, अरणगाव, कोळपे आखाडा, वाकोडी, बुरुडगाव, कर्जुनेखारे, देहेरे, विळद, निंबळक, इसळक, हमीदपूर, दरेवाडी, बुर्हाणनगर, वारुळवाडी, निंबोडी, शिंगवे नाईक, इस्लामपूर, नांदगाव, नागापूर, वडगाव गुप्ता, भिंगार, नागरदेवळे, बाराबाभळी.

पारनेर तालुका – राळेगण सिद्धी, मावळेवाडी, पाडळी आळे, सांगवीसूर्या, वाडेगव्हाण, यादववाडी, कळमकरवाडी, पठारवाडी, पिंपळनेर, पाडळी रांजणगाव, मोरवाडी, ढवणवाडी, हकीगतपूर, माजमपूर, म्हस्केवाडी.
पाथर्डी तालुका – बोरसेवाडी, लांडकवाडी, पत्र्याचा तांडा, सोमठाणे खुर्द, जांभळी, चेकेवाडी, शिंदेवाडी, निवडुंगे, बडेवाडी, बोंदरवाडी, चिंचपूर पांगूळ, रुपनरवाडी, धायतडकवाडी, हाकेवाडी, काळेवाडी, तनपूरवाडी, डोंगरवाडी, धारवाडी, जोहारवाडी, त्रिभुवनवाडी, रुपेवाडी, डमाळवाडी (चिचोंडी).

कर्जत तालुका– मलठण, निंबोडी, टाकळी खं., तरडगाव, आनंदवाडी, पठारवाडी, देशमुखवाडी, शिंदा, नांदगाव, पिंपळवाडी, कुळधरण, तळवडी, बारडगाव द., थेरवडी, बेनवडी, कोपर्डी, येसवडी, खातगाव, म्हाळंगी, बेलवंडी, ताजू, निंबे, कानगुडवाडी, रुईगव्हाण, कोळवडी, धांडेवाडी, नेटकेवाडी, शेगूड, धालवडी, करमणवाडी, शिंपोरा.

श्रीगोंदा तालुका – चोराची वाडी, गव्हाणेवाडी, दाणेवाडी, खरापवाडी, सुरोडी, एरंडोली, घोटवी, देऊळगाव.

श्रीरामपूर तालुका– माळवाडगाव, गोवर्धनपूर, निंबगाव खैरी.

राहुरी तालुका– घोरपडवाडी, धामोरी खुर्द, बाभुळगाव, खडांबे बु, खडांबे खु., सडे, गुहा, कुरणवाडी.

नेवासा तालुका – झापवाडी, नजिकचिंचोली, नांदूरशिकारी, पाथरवाला, सुलतानपूर, गेवराई, खडका, पिंप्री शहाली, पिचडगाव, उस्थळदुमाला, नेवासा बु., बाभुळखेडा, बेलपांढरी.

शेवगाव तालुका – करडगाव, नबाभुळगाव, खुंटेफळ, बेलगाव, वरखेड, राक्षी, मलकापूर, आपेगाव, आखेगाव, चापडगाव, गदेवाडी, खडके, मडके, पिंगेवाडी, वडुले खुर्द.
संगमनेर तालुका – घुलेवाडी, ढोलेवाडी, गाभनवाडी, पोखरी हवेली, अकलापूर, कोकणेवाडी, गोडसेवाडी, कौठे खुर्द, टेमरेवाडी, आभाळवाडी, येलखोपवाडी, शेळकेवाडी, वरवंडी, मोधळवाडी, आंबी खालसा, शांतीनगर, चौधरवाडी.

कोपरगाव तालुका – कासली, अंचलगाव, सावळगाव.

राहाता तालुका – रामपूरवाडी, रस्तापूर, कनकुरी, नांदुर्खी खु., एलमवाडी.

अकोले तालुका – नांचनठाव, शिवाजीनगर, शेणीत खु., आंबीतखिंड, घोटी, शिलवंडी, पिसेवाडी, धामणगाव पा., दिगंबर, कुंभेफळ, पिंपळदरी, चांदसूरज, चैतन्यपूर, बडगी, शिरपुंजे खु//, पिंपरकणे, जहागीरदारवाडी, म्हाळुंगी, बिताका, जायनावाडी, अगस्तीनगर, अंबड, चास, तळे, शिंदे, पिंपरी, वाघदरी, मोरवाडी, विहीर, गारवाडी, खुंटेवाडी, राजूर, जागाव, कोहडी, पुरुषवाडी, बलठण, शेणीत बु., बारी, मान्हेरे, कोलटेंबे, मुरशेत, कातळापूर, राणद बु, देवगाव, केळुंगण, मळेगाव, लाडगाव, आंबेवंगण, सरोवरवाडी, सावरगाव पाट, टाहाकरी, केळी रुमणवाडी, सांगवी, दगडवाडी, कोपरेवाडी, निरगुडवाडी, भोजदरावाडी, चितळवेढे, उंचखडक खु., बारववाडी (मवेशी).

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)