टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

file photo

वाघोली- पाण्याच्या टॅंकरची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाघोली – केसनंद रोडवर काळेओढा परिसरामध्ये मंगळवारी (दि. 13) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. सुभाष सुदाम कोतवाल (वय अंदाजे 40, रा. अष्टापूर, ता. हवेली), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी टॅंकर ताब्यात घेतला आहे. अपघातानंतर टॅंकरचालक फरार झाला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)