टूरिस्ट कार खरेदी प्रकरणी फसवणूक करणारा अटकेत

पुणे – टूरिस्ट कार खरेदी करण्याच्या बहाण्याने दोघांकडून प्रत्येकी 1 लाख 66 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याला 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. धनराज ऊर्फ धीरज भारत पुणेकर (वय 32, रा. सोलापूर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणात मंगेश सावंत (रा. सावंत) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 26 डिसेंबर 2015 रोजी बावधन येथील राणा व्हिल्स प्रा. लि. येथे ही घटना घडली. याबाबत किशोर निवृत्ती ससाणे (वय 59, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. धनराज हा राणा व्हिल्स प्रा. लि. कंपनीचा मालक आहे. तर सावंत हा व्यवस्थापक आहे. दोघांनी टूरिस्ट कार खरेदीसाठी गुंतवणूक केल्यास फायदा होणार असल्याची जाहिरात अहमदनगर जिल्ह्यात केली. ही जाहिरात पाहून फिर्यादी ससाणे आणि त्यांच्या मित्राने प्रत्येकी 1 लाख 66 हजार रुपयांची गुंतवणूक केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, याबाबत कंपनीने कोणताही परतावा दोघांना दिला नाही. त्यामुळे ससाणे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी धनराज याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्‍कम जप्त करण्यासाठी आणि फरार साथीदाराच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने धनराज याला पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)