टुर व्यवसायिकाकडून 11 लाखांची फसवणूक

file pic

पुणे – बाली-इंडोनेशीयाला टुरसाठी नेण्याच्या बहाण्याने एका टुर व्यवसायिकाने 23 जणांची 11 लाख 34 हजार 820 रुपयांची फसवणूक केली. या टुर व्यवसायिकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

सचिन विष्णु गायकवाड (रा. नऱ्हे) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा सिंहगड टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल नावाचा व्यवसाय आहे. फिर्यादी प्रकाश शिवरकर (51, रा. गाडीतळ, हडपसर) यांच्यासह इतर 23 जणांनी बाली-इंडोनेशीयाची टुर आरोपीकडे बुक केली होती. यासाठी आरोपीने त्यांच्याकडून सुमारे 11 लाख रुपये घेतले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पैसे घेतल्यानंतर त्याने टुरसाठी कोणतेही बुकींग केले नाही. या पैशाचा वापर त्याने स्वत:च्या फायद्यासाठी केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक के. एस. लोंढे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)