टी-20साठी भारतीय संघाची घोषणा;सुरेश रैना ईन, अय्यर आऊट

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, मनिष पांडे, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर.

मुंबई – दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. याशिवाय शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनाही संघात स्थान देण्यात आले. मात्र, सलामीवीर श्रेयस अय्यर याला वगळण्यात आले. सय्यद मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेत केलेली चांगली कामगिरी त्यांच्या पुनरागमनासाठी महत्वाचे कारण ठरलेली आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीने फेब्रुवारीत होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा केली. यात अय्यर शिवाय बासिल थम्प, दीपक हुड्डा, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान मिळविता आले नाही. वर्षभरापूर्वी सुरेश रैना फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला होता. यानंतर जवळपास वर्षभर सुरेश रैना भारतीय संघाच्या बाहेर होता.

श्रीलंकाविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत लग्नामुळे खेळू न शकलेला विराट कोहली आणि भुवनेश्‍वर कुमार पुन्हा संघात दाखल झाले आहेत. तसेच भुवनेश्‍वर कुमार आणि सलामीवीर शिखर धवन यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. महेंद्रसिंह धोनीवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आलेली असून दिनेश कार्तिकला राखिव यष्टीरक्षक म्हणून संघात जागा मिळालेली आहे.

याव्यतिरीक्त शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट यांनाही टी-20 संघात जागा मिळाली आहे. जयदेव उनाडकटला आयपीएलच्या निलामीत आज राजस्थान रॉयल्यसने तब्बल 11 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. एकदिवसीय सामन्यानंतर टी-20 मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्ग येथे 18 फेब्रुवारला खेळण्यात येणार आहे. तर अन्य सामने 21 आणि 24 फेब्रुवारीला होणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)