टीसीएसच्या ताळेबंदावर गुंतवणूकदार खूश

      शेअर उसळल्याने बाजारमूल्य 100 अब्ज डॉलरच्या उंबरठ्यावर

मुंबई – टीसीएस कंपनीने चौथ्या तिमाहीसाठीचा आणि सरलेल्या वर्षाचा चमकदार ताळेबंद जाहीर केला आहे. सर्वच विश्‍लेषकांच्या अंदाजापेक्षा चांगला ताळेबंद कंपनीने सादर केला. त्यातच रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे या कंपनीच्या शेअरची शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळे कंपनीच्या बाजार मूल्यात मोठी वाढ नोंदली गेली.
टीसीएसने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आणि रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे टीसीएस कंपनीसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअरच्या भावातही वाढ झाल्याचे दिसून आले.

-Ads-

टीसीएस कंपनीने गुरुवारी ताळेबंद जाहीर केला. यात शेवटच्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढून 6904 कोटी रुपये झाला आहे. तर महसूल 32075 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या रुपयातील आणि डॉलरमधील महसुलात मोठी वाढ झाली. त्याचबरोबर आगामी काळातही त्यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे कंपनीने सांगितले आहे.शुक्रवारी टीसीएसचा शेअर 6.76 टक्‍क्‍यांनी वाढून 3406.40 रुपये प्रति शेअर झाला. त्यामुळे कंपनीचे बाजार मूल्य 41300 कोटी रुपयांनी वाढून 652082 कोटी रुपयांवर गेले. हे मुल्य 660000 कोटी रुपये झाल्यानंतर कंपनीचे बाजारमूल्य 100 अब्ज डॉलर होणार आहे.

माहीत तंत्रज्ञान कंपन्या तेजीत असल्या तरी इतर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या व्यवहाराबाबत मात्र अनुत्साह होता. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीच्या कामकाजाचे इतिवृत्त काल जाहीर झाले आहे. त्यात बऱ्यात सदस्यांनी महागाई वाढण्याच्या शक्‍यतेमुळे व्याजदर वाढीची शक्‍यता खुली ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बाजारातील वातावरण आज नकारात्मक होते.

दरम्यान एकूण जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती लवचिक असल्यामुळे शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या छोट्या मोठ्या लाटा आल्या आणि निर्देशांकात फारसा पडला नाही. शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ 11 अंकानी म्हणजे 0.03 टक्‍क्‍यानी कमी होऊन 34415 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निप्टी 1 अंकाने कमी होऊन 10564 अंकावर बंद झाला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)