टीव्ही अजूनही मागास आहे- शमा सिकंदर

“ये मेरी लाईफ है’मधील शमा सिकंदर जाणीवपूर्वक टीव्हीपासून दूर राहिली आहे. तिच्या मते टीव्हीचा छोटा पडता अजूनही इतिहासातच अडकलेला आहे. 2014 मध्ये “बाल वीर’मध्ये परीच्या रुपात आलेली शमा सिकंदरने 2016 मध्ये डिजीटल माध्यमातच काम करण्याचा निर्णय घेतला.

 

टीव्हीच्या सिरीयल अतिशय बोअर असतात. त्यात काहीही इंटरेस्टिंग नाही. नावीन्य नाही. त्यातून काहीही घेण्यासारखे उरलेले नाही. अशा सिरीयलमध्ये काम केल्यामुळे आपल्या करिअरचा ग्राफ उंचावण्याऐवजी घसरण्याचीच शक्‍यता अधिक आहे, अशा शब्दात शमा सिकंदरने टीव्हीवरचा आपला रोष व्यक्‍त केला आहे. शमाने आतापरंत बगुतेक वेबसिरीज आणि “माया’ सारख्या सिनेमांकडून तिने काम केले आहे.

तिने आता स्वतःची प्रॉडक्‍शन कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती “अब दिल की सून’ या शॉर्ट फिल्म सिरीज करणार आहे. या सिरीजमधील प्रत्येक शॉर्ट फिल्म 5 ते 14 मिनिटांचीच असणार आहे. नवीन पिढीच्या मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करणाऱ्या या शॉर्ट स्टोरीज असणार आहेत. हे विषय मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी 3 तासांचा मोठा सिनेमाच करावा लागेल. एवढ्याने व्यवसायिक यश मिळणे शक्‍य नाही. शिवाय अशा सिनेमांचा प्रेक्षक वर्गही खूप मर्यादित असतो. आता या विषयांना न्याय द्यायचा तर वेब सिरीजचा पर्यायच सर्वोत्तम असतो, हे मान्य करावेच लागेल, असे शमाचे म्हणणे आहे. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी शमाने खूप गरिबीमध्ये दिवस काढले आहेत. तिला काही काळ नैराश्‍यानेही ग्रासले होते. त्यामुळे मानसिक आजारातून स्वतः गेल्यामुळे तिला स्वतःला अशा समस्यांबाबत जाणीव आहे. तिच्या शॉर्ट स्टोरीजमध्ये तिला स्वतःचेच प्रतिबिंब मांडायचे आहे.
शमा सिकंदर सध्या जेम्स नावाच्या एका अमेरिकन हिरोच्या प्रेमात आहे. सर्वसाधारणपणे ज्याच्याबरोबर आपण स्वतःला कंफर्टेबल असतो, त्याच्याबरोबरच आयुष्याची स्वप्ने रंगवली जातात. त्यामुळे आपया लव्ह लाईफबद्दल ती अगदी खूष आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)