टीव्हीवरील कार्यक्रमात पाकिस्तानी मंत्र्याला थप्पड !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रम चालू असताना एका पाकिस्तानी मंत्र्याला थप्पड मारण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पाकिस्तानान घडला आहे. कार्यक्रम चालू असताना माजी क्रिकेटपटू इमरान खानच्या पीटीआय (पाकिस्तान तहरिक ए इन्साफ ) पक्षाचे एक नेते नईमुल हक यांनी अचानकपणे केंद्रीय मंत्री आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) चे दानियाल अजीज यांना थप्पड मारली. दानियाल अजीज यांना मारलेली थप्पड नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी हक आणि अजीज यांच्यात आपस की बात नावाचा कार्यक्रम चालू होता. मुनीब फारुख या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करत होता. कार्यक्रमात चांगल्या प्रकारे चर्चा चालू असताना अचानक नईमुल हक संतप्त झाले. बहुदा दानियल अजीज यांनी वापरलेला एखादा शब्द त्यांच्या जिव्हारी लागला असवा. त्यामुळे त्यांनी अचानकपणे दानियल अजीज यांना बसल्या बसल्याच थप्पड मारली. बेसावध असलेल्या दानियल अजीज यांना थप्पड बसेपर्यंत त्याचा पत्ताही लागला नाही. हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दानियल अजीज यांना थप्पड मारल्यानंतर “मला चोर म्हणण्याची तुझी हिम्मत कशी झाली? मी चोर आहे काय?’ असे नईमुल हक म्हणताना ऐकायला येत आहे. मात्र हक यांनी थप्पड मारल्यानंतरही अजीज यांनी संयम सोडला नाही. ही घटना पीटीआयची संस्कृती दाखवते असे नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. पीटीआयच्या नेत्याची वर्तणूक अत्यंत असहिष्णू आहे. त्यांना टीका सहन करायची हिंमत नाही आणि जरा काही मनाविरुद्ध झाले की, ते ताबडतोब हाणामारीवर उतरतात अशी टीका अजीज यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)