नागरीक काय बघतात यावर आता सरकारचे लक्ष
कॉंग्रेसच्या सुरजेवालांनी केला आरोप
नवी दिल्ली – केंद्रातील भाजपचे सरकार हे सर्व्हेअलन्स सरकार आहे. या सरकारने आता टीव्हीच्या सेट टॉप बॉक्स मध्ये एक चीप बसवून लोक टीव्हीवर नेमके काय पहातात यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे असा आरोप कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केला आहे.
या संबंधात एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, लोक चार भिंतीच्या आत आपल्या घरातील टीव्ही स्क्रीनवर नेमके काय बघतात हे स्मृती इराणी यांना डोकाऊन बघायचे असून त्यासाठी त्यांनी टीव्हीच्या सेटटॉप बॉक्स मध्ये चीप बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे. लोकांच्या खासगी मामल्यात सरकारचा हा आणखी एक हस्तक्षेप असून अब की बार सर्वेलन्स सरकार अशा शब्दात सुरजेवाला यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.
BREAKING! The Next Stage of Surveillance by BJP Revealed!
In a serious breach of privacy, Smriti Iraniji wants to know what show you watch on your TV, within the four walls of your bedroom, without your permission! Why?
अबकी बार Surveillance सरकार,
निजता का हक़ कर तार-तार! pic.twitter.com/2RqHNekaaE— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 16, 2018
दरम्यान या प्रस्तावाविषयी माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, टीव्ही सेटटॉप बॉक्स मध्ये विशिष्ट प्रकारची चीप बसवण्याची सरकारची योजना आहे हे खरे आहे. यातून कोणत्या वाहिनीचे कोणते कार्यक्रम अधिक पाहिले जातात याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे आणि त्याच उद्देशाने ही उपाययोजना केली जाणार आहे. सरकारच्या जाहीरात विभागाला आपल्या जाहीरातींचे योग्य नियोजन करता यावे यासाठी ही माहिती संकलीत केली जाणार आहे असेही या अधिकाऱ्याने सांगितले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिकॉम रेग्युलॅटरी ऍथॉरिटीला टीव्हीच्या सेटटॉप बॉक्स मध्ये अशी चीप बसवून दूरचित्रवाणी वाहिनीच्या प्रसारणाची माहिती संकलीत करण्याची सूचना केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा