पिंपरी  – टीव्हीचा आवाज मोठा करुन राहत्या घरात एकाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्रीच्या सुमारास बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. उमेश शिंदे (वय-41, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश शिंदे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत घराबाहेर गप्पा मारत बसले होते. त्यानंतर अचानक उमेश घरात गेले आणि आतून दरवाजा बंद केला. कोणाला आत्महत्या करत असल्याचे समजू नये म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज मोठा केला आणि छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ उमेश यांना आवाज दिला मात्र आतून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या घरातील अन्य व्यक्तींनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी उमेश यांनी आत्महत्या केल्याचे समजले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)