टीडीपीनंतर आता गोरखा जनमुक्ती मोर्चा ‘एनडीए’तून बाहेर

नवी दिल्ली :  केंद्रातील ‘एनडीए’ सरकारवर मित्रपक्षांच्या नाराजांची संख्या वाढतच आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीनंतर आता गोरखा जनशक्ती मोर्चा सुद्धा ‘एनडीए’तून बाहेर पडला आहे. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारसोबत आपला यापुढे कोणताही संबंध नाही, असे गोरखा जनमुक्ती मोर्चाने स्पष्ट केले.
एनडीए सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष एलएम लामा यांनी आज केली आहे. भाजपने गोरखांसोबत विश्वासघात केला असून यापुढे भाजपसोबत आपला कोणताही संबंध राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे. भाजप आणि गोरखा जनमुक्ती मोर्चा यांच्यातील युती ही केवळ निवडणुकीपुरती होती, असे विधान पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केले होते.
गोरखा जनमुक्ती मोर्चा आपला मित्रपक्ष आहे आणि केंद्र सरकारमधील घटक पक्ष आहे. असे विधान करणाऱ्या भाजप नेत्यांचा दुटप्पीपणा आता समोर आला आहे, असे लामा म्हणाले. दार्जिलिंग लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार जसवंत सिंह यांना गोरखा जनमुक्ती मोर्चाने पाठिंबा दिला होता. भाजपने लोकांना धोका दिला आहे. भाजपमुळेच दार्जिलिंगमधील लोक अविश्वास व्यक करतात, असा आरोपही लामा यांनी यावेळी केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)