टीकाकारांना चपराक

निवडणूक आयोगाने यंदा 100 टक्‍के व्हीव्हीपॅटच्या वापराची घोषणा केली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून ईव्हीएम मशिनवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना तसेच शंका घेणाऱ्यांना चपराक देण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे असे म्हणावे लागेल. निवडणूक ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये कधीच कुणाचेही 100 टक्‍के समाधान होत नाही. मात्र देशभरातील मतदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निवडणूक आयोग नेहमीच निवडणुका पारदर्शक वातावरणात घेण्याचा प्रयत्न करत असतो. आयोगाच्या कोणत्याही निर्णयामागे अपार मेहनत आणि दूरदृष्टी दडलेली असते. सात-आठ टप्प्यांमध्ये निवडणुका घेणे ही सोपी गोष्ट नाही. अर्थात यंदाच्या वेळी निवडणूक आयोगाने वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय का घेतला आहे याची समीक्षा झाली पाहिजे. दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुका दरवेळी नवे स्वरूप घेत असतात. निवडणूक आयोग बदलत्या नव्या परिस्थितीनुसार नवे निर्णय घेत असतो, हे मतदारांनी लक्षात घ्यायला हवे.
– जगदीप छोकर, संस्थापक, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्‌

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)