‘टीईटी’ परीक्षा मार्चमध्येच घेण्याची तयारी

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबत शासनालाही कळविण्यात आलेले आहे. राज्य शासनाने शिक्षकांच्या नोकरीसाठी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन उमेदवारांना घातले आहे.

वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेण्याची घोषणा शासनाकडून अनेकदा करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, वर्षातून एकदाच परीक्षा घेण्यात येते. चालू वर्षात 15 जुलैला परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर अद्याप परीक्षाच झालेली नाही. सन 2012 च्या दरम्यान सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना येत्या 31 मार्चपूर्वी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे या शिक्षकांना परीक्षा कधी होणार याची उत्सुकता लागली आहे.

परिषदेने येत्या जानेवारीमध्ये परीक्षा घेण्याबाबत नियोजन केले होते. या मान्यतेसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे परिषदेकडून 18 सप्टेंबरलाच प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र शासनाकडून या प्रस्तावाची त्वरीत दखलच घेण्यात आली नव्हती. त्यानंतर आता शासनाला उशिरा जाग आलेली आहे. शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून परिषदेकडे परीक्षा कधी घेता येऊ शकेल याबाबतची नुकतीच विचारणा करण्यात आली आहे. त्यावर परिषदेने आता मार्चमध्येच परीक्षा घेता येईल, असे शासनाला कळविले आहे. त्यामुळे शासनाकडून रितसर मान्यतेचे पत्र लवकर प्राप्त होणार आहे.

परिषदेच्या वतीने 24 फेब्रुवारीला इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. ही मोठी परीक्षा आहे. दहावी व बारावीच्या परीक्षाही फेब्रुवारी, मार्चमध्येच होणार आहे. या परीक्षामध्ये शिक्षण विभागाची सर्व यंत्रणा व्यस्त असते. या परीक्षा झाल्यानंतरच “टीईटी’ परीक्षेसाठी यंत्रणा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
50 :thumbsup:
2 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
3 :blush:
2 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)