टिश्‍यूपेपर विक्री 15 टक्‍क्‍यांनी वाढणार

मुंबई: भारतातील लोक आरोग्य आणि स्वच्छता याबद्दल अधिक जागरूक होत असल्यामुळे भारतातील टिश्‍यूपेपर बाजारपेठ 15 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा असून 2022 पर्यंत ती दरवर्षी 2.50 लाख टन पर्यंत पोहोचेल असा अंदाज सेंच्युरी पल्प अँड पेपर कंपनीचे मुख्य विक्री अधिकरी डॉ. अलोक प्रकाश यांनी व्यक्त केला. यामुळेच कंपनीने टिश्‍यू उद्योगात पदार्पण केले असल्याचे ते म्हणाले. जागतिक टिश्‍युपेपर बाजारपेठेत 4 टक्के सीएजीआर स्थिर वाढ दिसून येत आहे.

बदलती जीवन शैली, आरोग्यसेवा सुविधावर वाढत असलेला खर्च, जागतिक पातळीवर जीडीपीमध्ये होत असलेली वाढ या घटकांमुळे टिश्‍यू पेपर उद्योगात सातत्याने वाढ होत आहे. तसेच येणाऱ्या काळात शाळा, महाविद्यालय व पथनाटयाच्या माध्यमातून टिश्‍यूबद्दल जागरूकता करण्या येणार असल्याचे त्यांन सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)