यंदाच्या ६-१६ सप्टेंबर दरम्यान ४३ व्या टोरेंटो फिल्म अंतरराष्ट्रीय फिल्मोत्सव (टिफ) मध्ये भारतीय चित्रपटांची जत्रा भरणार आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दकी याच्या ‘मंटो’ सहित भारतीय ११ चित्रपट यात दाखवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भारतीय उपखंडात चित्रित झालेले अन्य  तीन चित्रपट देखील  दाखविले जाणार आहेत.
या तीनचित्रपटांमध्ये ब्रिटिश दिग्दर्शक मायकल विंटरबॉटम  यांचा ‘द वेडींग  गेस्ट’, फ्रान्सच्या निर्मात्यांचा ‘माया’, तर ऑस्ट्रेलियन निर्माता ऍंथोनी मरास यांचा होटल हाचित्रपट देखील दाखविला जाणार आहे. त्यातील ‘होटल मुंबई’ आणि ‘द वेडींग गेस्ट’  हे चित्रपट २००८ मध्ये झालेल्या मुंबई आतंकवादी हिमालयावर आधारीत आहेत. होटल मुंबई मध्ये प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता देव पटेल काम करत आहे. जो ऑस्कर विजेत्या स्लमडॉग मिलियनीअर’ चित्रपटात मुख्य भूमिकेत होता.
 या चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटात अनुराग कश्यप यांचा मनमर्जियां’, नंदिता दास यांचा  ‘मंटो’, रिमा दास यांचा असामी चित्रपट  ‘बुलबुल कैन सिंग’ आणि  रितू सरीन व तेंजिंग सोनम यांचा ‘द स्वीट रेक्वीम’ यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)