टिटेघर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

भोर- समाजात जेवढे म्हणून मोठे झालेले मी पाहिले ते सारे कमी शिकलेले होते. मात्र कमी शिकलेलेच मोठे होतात, याचे प्रत्यंतर आज मला ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर या शिक्षण वेड्या पोराच्या यशस्वी वाटचालीतून पुन्हा एकदा पाहायला मिळाले असे उद्‌गार सिंधुताई सपकाळ यांनी टिटेघर (ता. भोर) येथील कार्यक्रमात काढले. राजमाता जिजाऊ कन्या शैक्षणिक योजनेतील शैक्षणिक साहित्य किट आणि शिष्यवृत्ती वाटप तसेच टेक्‍नोफोर कंपनीने बांधलेल्या बहुउद्धेशीय इमारतीचे उद्‌घाटन सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन टेक्‍नोफोर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण ढोले पाटील, राघवेंद्र जोशी, मिलिंद पाटील, अनिरुद्ध कोंडटकर, मुकुंद कर्वे, रमेश केंद्रे, राजेश राठोड, टिटेघर ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर तावरे, उप सरपंच माणिक नवघणे, आनंदा नवघणे, पोलीस पाटील तानाजी निगडे, केंद्र प्रमुख अंजना वाडकर, मुख्याध्यापक सिद्धेश्वर खोपडे, डॉ. शिंदे, बर्वे यांसह माध्यमिक, प्राथमिक शाळांचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात आदिवासी समाजातील केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी समीर दीपक पवार यास 40 हजारांचा धनादेश, स्पोर्टस गर्ल आरती शिंदेला आर्थिक मदतीचा धनादेश, आरती निगडेकर हिला वार्षिक एस.टी. भाड्यासाठीचा 5 हजार रुपयांचा धनादेश, तर तनुजा अंकुश साळेकर आणि इतर 576 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव केळकर यांनी केले, सुञ संचालन शरद दळवी यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)