टिकाऊ वाटेवरची कोकिळा

प्रियांका जाधव

टाकाऊपासून टिकाऊ करण्याचे तंत्र अनेकांना अवगत असते. कोकिळा देशपांडे यांनी हे तंत्र चांगलेच आत्मसात केले आहे. मूळच्या कर्नाटकातील हुबळीच्या आणि आता पुण्याच्या रहिवासी असलेल्या कोकिळा यांनी वृत्तपत्राच्या कागदापासून पिशव्या आणि अन्य वस्तू तयार करण्याची कला विकसित केली. दुसऱ्या दिवशी रद्दीत घालणाऱ्या पेपरचा योग्य वापर करून त्यांनी घरबसल्या महिलांना रोजगार देण्याचे कामही केले आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत पेपरपासून एकाहून एक सरस वस्तू तयार करण्याचे कसब कोकिळा यांनी साधले आहे. विशेष म्हणजे पिशव्याच नाही तर खूर्ची, स्टूल आणि बॅगची निर्मिती पेपरच्या कागदाने केली आहे.

कोकिळा यांचा जन्म हुबळीत झाला. मात्र, त्यांनी पुण्यात शालेय आणि कॉलेज शिक्षण पूर्ण केले. त्यांना आर्किटेक्‍चर होण्याची खूप इच्छा होती आणि ती पूर्ण केली. 36 वर्षीय आर्किटेक्‍चर कोकिळा आता मुंबईत अव्यक्त नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात. ही संस्था वृत्तपत्राच्या कागदापासून इकोफ्रेंडली बॅगा तयार करण्याचे काम करते. या बॅगा तयार करण्यासाठी त्यांनी नवीन तंत्र अंगीकारले. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा ग्लू वापरला जात नाही.

मेटल पिन किंवा टेपच्या मदतीने ही बॅग तयार करण्यात येऊ लागली. कागदापासून तयार केलेली बॅग पाच किलोपर्यंतचे वजन सहजपणे वाहून नेऊ शकते. कागदाला मजबुती देऊन कोरडे पदार्थ सहजपणे यातून नेता येऊ शकतात, असे कोकिळा सांगतात. या बॅगा तयार करण्याचे काम शहरी आणि ग्रामीण भागातील गृहिणी करतात. त्यांना बॅगा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी असंख्य महिलांना प्रथमच उत्पन्नाचे साधन गवसले होते. गारमेंट फॅक्‍ट्रीत वाया गेलेला कपड्यापासून पिशव्यांना उचलण्यासाठी हॅंडल तयार करण्यात आले.

आजमितीला 30 ते चाळीस महिला “अव्यक्त’ संस्थेत काम करतात. कोकिळा यांनी अन्य स्वयंसेवी संस्थांशी देखील संवाद साधला आणि गरजू महिलांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली आहे. पिशव्यांच्या आकारावर त्याची किंमत निश्‍चित करण्यात आली आहे.

साधारणपणे सहा रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंत बॅगची किंमत ठरवण्यात आली आहे. या बॅगा साधारणत: 20 ते 30 प्रकारात उपलब्ध आहेत. याशिवाय ग्राहकांना हव्या असलेल्या आकारात आणि डिझाईनमध्ये बॅगा तयार करून दिल्या जातात. वेस्टेज फॅब्रिकपासूनही पाऊच तयार करण्यात येते. बबल रॅपऐवजी या पाऊचची पॅकिंग अधिक टिकावू आहे. आयटी इंजिनिअर मंडळींना देखील या बॅगा साह्यभूत ठरत असल्याचेही कोकिळा सांगतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)