टाळ्या वाजवा निरोगी राहा…

टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होत असल्याचं समोर आलं आहे. म्हणून या प्रकाराला क्‍लॅपिंग थेरपी असं म्हटलं जातं. म्हणून मुद्दाम ही थेरपी वापरण्यासाठी काही वेळा डॉक्‍टरांकडून सल्लाही देण्यात येतो.
मानवी शरीरात प्रेशर पॉइंट्‌स असतात. त्यापैकी काही हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. त्या प्रेशर पॉइंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होतात.

क्‍लॅपिंग थेरपी खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यांसमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरतो.
सकाळच्या वेळेस 5-10 मिनिटं टाळ्या वाजवल्यास तुम्ही फीट आणि ऍक्‍टिव्ह राहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉक्‍टर देतात.

टाळी वाजवल्यानंतर कोणत्या अॅक्‍युपंचर पॉइंटला चालना मिळते?
हॅंड वॅली पॉइंट (Hand valley point)
बेस ऑफ थंब पॉइंट अर्थात अंगठ्याच्या खालचा भाग (Base of thumb point)
रिस्ट पॉइंट मगनट (Wrist point)
इनर गेट पॉइंट (Inner gate point)
थंब नेल पॉइंट अंगठयाचं नख (Thumb nail point)

या पाच पॉइंट्‌सला चालना दिल्यास खालील फायदे होतात.
हे फायदे पुढीलप्रमाणे
हृदयाच्या आणि फुप्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.
पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.
गाऊट्‌च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्‍लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.
लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.

टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.
क्‍लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.
क्‍लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.
क्‍लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.
मधुमेह, अथ्रराईटीस, रक्तदाब, नैराश्‍य, डोकेदुखी, निद्रानाश, केसगळती, डोळ्यांचे विकार यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी क्‍लॅपिंग थेरपी मदत करते.
सतत एसीमध्ये बसून काम करणाऱ्यांना घाम येत नाही. अशा लोकांनी क्‍लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)