टाळा प्रोस्टेट कॅन्सरमुळे होणारा मृत्यूचा धोका (भाग-१ )

दरवर्षी 200000 हून जास्त लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे निदान होते आणि अंदाजे हजारो लोक मृत्युमुखी पडतात. त्वचेच्या कॅन्सरनंतर प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये सर्रास होणारा कॅन्सर आहे. सरासरी सातपैकी एका पुरुषाला त्यांच्या आयुष्यात प्रोस्टेट कॅन्सर होतो.

पुरुषांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी प्रोस्टेट कॅन्सर हा एक मुख्य कॅन्सर आहे आणि मृत्यूलाही तेवढाच कारणीभूत आहे. प्रोस्टेट कॅन्सरच्या गाठी अतिशय प्राणघातक असतात आणि जर लवकर निदान झाले तर त्या ब-या होऊ शकतात. जर हा कॅन्सर पसरला तर रुग्णाला हाडांमध्ये वेदना जाणवू शकते, त्याचे वजन घटते आणि किडनी निकामी होते. प्रोस्टेट कॅन्सरचा उपचार क्‍युरेटिव्ह (शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी) किंवा पॅलिटिव्ह (हार्मोन औषधे) असतो. याची लक्षणे केवळ आजाराच्या उशिराच्या टप्प्यावर दिसू लागतात, त्यामुळे वार्षिक रक्त तपासणी करणे प्रोस्टेट कॅन्सर शोधण्यासाठी आवश्‍यक असते.

प्रोस्टेट कॅन्सरचे निदान कोणत्याही पुरुषासाठी नक्कीच दु:खप्रद असते; परंतु प्रोस्टेट कॅन्सर लवकर निदान झाल्यास बरा होऊ शकतो आणि म्हणूनच लवकर निदान होणे महत्त्वाचे असते. कोणत्याही आजाराचे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी अनेक विकल्पांचा अवाका शिल्लक राहतो. केवळ पीएसएची एक रक्ततपासणी आणि डिजिटल रेक्‍टल एक्‍झाम प्रोस्टेट कॅन्सरच्या शंकेच्या तपासणीसाठी पुरेसे असते.

जर कॅन्सर फक्त प्रोस्टेट ग्रंथीच्या आतच आहे असे निदान नक्की झाले तर किहोल सर्जरीने संपूर्णपणे बराहोऊ शकतो. ही शस्त्रक्रिया आत्ताच्या दिवसांमध्ये लेप्रोस्कोपी किंवा रोबोटिक्‍सने केली जाते. दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रियांचे परिणाम एकसारखे असतात आणि त्या जुन्या टाक्‍यांच्या शस्त्रक्रियेपेक्षा जास्त परिणामकारक आहेत. सध्या कॅन्सरचा प्रसार जर फक्त प्रोस्टेट ग्रंथीमध्ये असेल तर याला किमान इनव्हॅसिव्ह शस्त्रक्रियांमार्फत उपचार करण्याची आणि रुग्णाच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याची संधी असू शकते.

जरी कॅन्सरचा फैलाव जास्त झाला असेल तर नवीन औषधांनी हा फैलाव नियंत्रित करणे आणि रुग्णास जास्तीत जास्त जीवनकाल देणे सोपे होते, जे इतर कॅन्सरमध्ये शक्‍य नाही. त्यामुळे सुयोग्य युरॉलॉजिस्टद्वारे योग्य उपचार करणे अतिशय महत्त्वाचे असते.
प्रोस्टेट कॅन्सर पूर्णपणे नव्हे पण काही प्रमाणात अनुवांशिक आजार आहे. यामुळे प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णाचे नातेवाईक इतरांपेक्षा जास्त जोखमीवर असतात.

कोणत्याही आजाराला प्रतिकार करण्याची सर्वोत्तम पध्दत म्हणजे नियमित आरोग्य चिकित्सा करून घेणे, तुमच्या आजाराला समजून घेणे आणि लढ्याच्या पत्येक पातळीवर मार्गदर्शन घेणे होय. ताजी फळे, टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहार प्रोस्टेट कॅन्सर विरुद्ध लढा देण्यासाठी फायदेशीर ठरतात.

आयसीएमआरच्या अंदाजानुसार, भारतात 2020 सालापर्यंत कर्करोगाच्या 17.3 लाख नवीन रुग्णांची भर पडेल. यात प्रामुख्याने फुप्फुसे, स्तन, गर्भाशयमुख आणि प्रोस्टेट कर्करुग्णांचा समावेश असेल. कर्करोग हा आजार नाही, तर एक सिण्ड्रोम आहे. पेशींची अनियंत्रित वाढ या अवस्थेत दिसून येते. पर्यावरणातील तसेच जीवनशैलीतील बदलांमुळे आपल्या देशात कर्करोग हा साथीच्या रोगासारखा झाला आहे. महाराष्ट्रातही 2020 सालापर्यंत फुप्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या दरवर्षी साडेतीन हजारांवर जाईल, असा अंदाज आहे.

2012 सालापर्यंत भारतात फुप्फुसाचा कर्करोग झालेल्यांची संख्या 70000 होती. धूम्रपान हे यामागील महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यातही धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासात आलेल्यांना (पॅसिव्ह स्मोकर्स) फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.

ग्लोबाकॅन ही जगभरातील कर्करोगाचा कल या विषयावर संशोधन करणारी एक आंतरराष्ट्रीय एजन्सी आहे. या एजन्सीच्या अहवालानुसार 2020 सालापर्यंत भारतात प्रोस्टेट कर्करोगाचे 25000 रुग्ण असतील आणि दरवर्षी सुमारे 15000 रुग्ण या विकाराने दगावतील, असे ग्लोबोकॉन 2012 या अहवालात म्हटले आहे.

प्रोस्टेट कर्करोग पुरुषांमध्ये अत्यंत सामान्यपणे आढळतो. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान लवकर झाले तर त्याच्यावर यशस्वी उपचार करता येऊ शकतात. किंबहुना लवकर निदान झाल्यास 10 पैकी 9 प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांवर दीर्घकालीन उपचार करता येऊ शकतात. लवकर निदान होण्यासाठी या रोगाबद्दल जागृती आणि चाचणीच्या पद्धती उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे.

डॉ. अविनाश देव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)