टायर फुटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू

दौंड – दौंड शुगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी मोटार टायर फुटून पलटी झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.29) पहाटे घडली. बापू तुकाराम येडे (रा. येडे वस्ती, लिंगाळी, ता. दौंड) मयत चालकाचे नाव आहे. बापू येडे हे आपल्या चारचाकी मोटार (एमएच 42 के 9681) घेऊन अशोकनगर येथे आले असता त्यांच्या मोटारीच्या पुढील बाजूचा टायर फुटला. त्यामळे मोटार वेगात उलटली. यात ते मोटारीखाली दबल गेल्याने त्यांच्या छातीला आणि डोक्‍याला जबर मार लागला. यातच त्यांचा मृत्यू झाला. या याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवलदार कल्याण शिंगाडे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)