टायर फुटून झालेल्या अपघातात सात जखमी

श्रीरामपूरच्या टाळकीभान शिवारातील घटना : जखमींमध्ये महिलेची प्रकृती चिंताजनक

ग्रामसेवक दुचाकी सोडून पळाल्याने बचावले

मोटारीचा टायर फुटल्याने ती रस्त्यावर दोनशे मीटरपर्यंत धावत होती. टाकळीभानचे ग्रामसेवक राजेंद्र तगरे हे रस्त्याने जैनपूर येथे चालले होते. मोटार त्यांच्या अंगावर येत होती. त्यांनी प्रसंगावधान दाखवित दुचाकीवरून उडी घेत बाजूला पळाले. त्यामुळे ते अपघातातून बचावले.

टाकळीभान – भरघाव वेगात असलेल्या मोटारीचा टायर फुटल्याने ती झाडावर आदळून झालेल्या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. टाकळीभान (ता. श्रीरामपूर) शिवारात ही घटना झाली. यामध्ये कार चक्काचूर झाली. या अपघातातील जखमी झालेल्या महिलेची प्रकृती गंभीर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोणी येथील रुग्णालयात तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जखमी चालकासह सहा प्रवासींवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमोल रवींद्र बागुल (वय 23), सपना अमोल बागुल (वय 21, दोघे रा. चाळीसगाव), अदित्य संदीप नरोडे (वय 7), सुमन बाबुराव नरोडे (वय 45), सविता रतन जाधव (वय 32), आकाश रतन जाधव (वय 20), व चालक संतोश रतन जाधव (वय-22, सर्व रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) हे या अपघातात जखमी झाले आहे. औरंगाबाद येथून देवदर्शन करून ते परतत होते. टाकळीभान शिवारात त्यांची मोटार भरघाव वेगात होती.

यातच मोटारीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. टायर फुटल्याने मोटार रस्त्यानेच दोनशे फूट नागमोडी वळणे घेत धावत होती. मोटारीचा वेग काहीसा कमी होत ती झाडावर जाऊन आदळली. यानंतर मात्र ती पलटी झाली. यात मोटारीचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात मोटारीतील महिला थेट बाहेर रस्त्यावर फेकली गेली.

हॉटेल चालक अविनाश वाघुले, वंसत वाकडे, अण्णासाहेब रणनवरे, संतोष वाघुले, देविदास बनकर, लाजरस रणनवरे, आरीफ शेख, कचू गोड यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना मदत केली. टाकळीभान येथील आरोग्य केंद्रात जखमींवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना श्रीरामपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. जखमींपैकी सपना अमोल बागूल या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या जखमींमध्ये सात वर्षाच्या चिमुरड्याचा देखील समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)