टायर फुटून गाडी डोहात बुडाली

कोल्हापूरजवळ भीषण अपघात 5 जणांचा मृत्यू 

कोल्हापूर – गणपतीपुळे येथुन देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या मिरज येथील भाविकांवर आज काळाने घाला घातला. कोल्हापुर-पन्हाळा मार्गावर गाडीचा टायर फुटुन गाडी रेडे डोहात पलटी झाली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन बालके जखमी झाले आहेत .मध्यरात्री दोनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये पाचही महिला असुन त्यातील चार जणी एकाच कुटुंबातील आहेत.

-Ads-

अश्‍विनी सुनील तांदळे (26),अनिषा सुनील तांदळे (14) ,जान्हवी सुनील तांदळे (7),बेबी सुनील तांदळे (3) आणि धनश्री शशिकांत माने (7,सर्व रा. दत्त कॉलनी मालगाव रोड मिरज) अशी मृतांची नावे आहेत. तर आदर्श नितीन तांदळे (5),ओम सुनील तांदळे (वय5) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दत्त कॉलनी, मिरज येथील तांदळे आणि माने कुटुंब तवेरा (एमएच-15-ईबी-4340) कारने चालकासह एकूण 16 जण प्रवास करत होते. सर्वजण गणपतीपुळे येथून देवदर्शन करुन परतत होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर गाडीच्या मागील उजव्या बाजूचा टायर फुटल्याने गाडी रेडे डोह येथे जलपर्णी असलेल्या पाण्यात बुडाली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)