सातारा,दि.7 – राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या टायपिंग तसेच लघुलेखन (शॉर्ट हॅन्ड) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. टायपिंग परीक्षेचा निकाल 80.01 टक्‍के लागला असून लघुलेखन परीक्षेचा निकाल 38.17 टक्‍के लागला असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी दिली.

परिषदेमार्फत 2 ते 6 जुलैदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. याचा निकाल 6 सप्टेंबर रोजी परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरुन निकालाची ऑनलाईन प्रिंट घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची परिषदेकडून देण्यात येणारी गुणपत्रिका संस्थेकडे पाठविण्यात येतील.
या टायपिंगच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 74 हजार 942 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 59 हजार 962 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 600 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत तर राज्याचा एकूण निकाल 80.01 टक्‍के लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)