“टायझर ब्रॅंड’द्वारे दिवाळीसाठी “कम्फी स्ट्रेच’ शर्टसची नावीन्यपूर्ण श्रेणी ! 

पुणे: स्टायलिश व ब्रॅंडेड कपड्यांसाठी लोकप्रिय ठरलेल्या “टायझर’ ब्रॅंडने खास दिवाळीनिमित्त “कम्फी स्ट्रेच’ शर्टसची नवीन श्रेणी सादर केली आहे. वळताना, वाकताना, टर्न किंवा ट्विस्ट होताना हे शर्टस्‌ खांदे, हात, कोपरे, पोट किंवा पाठीच्या जागी स्ट्रेच तर होतातच आणि अतिशय आरामदायी अनुभवही देतात. म्हणूनच “कम्फी स्ट्रेच’ श्रेणीतील सर्व कपडे हे कम्फर्टेबल आणि स्ट्रेचेबल आहेत. तरुणाईला आवडणाऱ्या “स्लीम फिट’ मधील या शर्टसमध्ये “इंटेलिस्ट्रेच’ आहे. तसेच हे शर्ट अत्यंत स्टायलिश असून दिवाळीसाठी फ्रेश कलर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

“कम्फी स्ट्रेच’च्या संकल्पनेबाबत अधिक सांगताना “टायझर’चे संचालक श्री. कुणाल मराठे म्हणाले, “”आजच्या तरुणांना कशातही कॉम्प्रमाईज करायला आवडत नाही. परंतु स्टायलिश कपडे आकर्षक असूनही कम्फर्टेबल नसतात आणि त्यामुळे तरुणांना नाईलाजाने कॉम्प्रमाईज करणे भाग पडते. हा माझाही व्यक्तिगत अनुभव आहे. म्हणूनच तरुणांची ही समस्या ओळखून “कम्फी स्ट्रेच’ या संकल्पनेतील श्रेणीची निर्मिती केली आहे. यामुळे आता शारीरिक हालचालींवर कोणत्याही मर्यादा न घालता, कम्फी स्ट्रेच शर्ट स्वतःच स्ट्रेच होईल आणि तुम्हाला कम्फर्ट देईल”.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शर्टस्‌मध्ये स्ट्रेच देऊन आरामदायी अनुभव देणारे कम्फी स्ट्रेच शर्टस्‌ भारतात प्रथमच “टायझर’ ब्रॅन्डने सादर केले आहेत. बेस्ट क्‍वॉलिटी, स्टाईलीश लूक आणि योग्य किंमत ही “टायझर’ची वैशिष्ट्ये “कम्फी स्ट्रेच’मध्ये देखील आहेत. कम्फी स्ट्रेच या श्रेणीमध्ये ग्राहकांना शर्टसशिवाय टाऊझर्स ही उपलब्ध असून या ट्राऊझर्स मध्ये पायांना व विशेष करून कमरेलाही स्ट्रेच मिळतो. फक्‍त एका वर्षात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर इ. शहरांमध्ये “टायझर’ची 50 शोरूम्स आहेत. आगामी काळात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शोरूम्सची संख्या 100 करण्याचे उद्दिष्ट असेल असेही मराठे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)